अनियमित साखर कारखान्यामुळे संतप्त शेतकऱ्यांचा सरव्यवस्थापकांना घेराव

बाजपूर : साखर कारखाना नियमीत सुरू नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक त्रिलोक सिंह मर्तोलिया यांना घेराव घातला. कारखाना वारंवार बंद पडत असल्याने लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे म्हणणे मांडले. यावेळी सर व्यवस्थापकांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

शेतकऱ्यांनी कारखाना बंद असल्याबद्दल प्रशासनाला धारेवर धरले. कारखाना बंद असल्याने ऊस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना ३ – ३ दिवस जेवण न खाता तेथे थांबावे लागत असल्याचे म्हणणे मांडले. बाजपूर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक कैलाश टोलिया यांचे निधन नुकतेच झाले होते. त्यानंतर आता त्रिलोक सिंह मार्तोलिया यांच्याकडे कार्यभार देण्यात आला आहे. मात्र, कारखान्यांचे अधिकारी बेफिकीर कारभार करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कारखान्याचे उपमुख्य इंजिनीअर नारायण सिंह यांनी सांगितले की, बगॅस ओला असल्याने कारखाना सुरू झालेला नाही. शेतकऱ्यांनी जीएमसमोर ऊस दर देण्याचीही मागणी केली. यावेळी विजेंद्र सिंह डोग्रा, प्रताप सिंह संधू, गुरमीत सिंह, अजीत प्रताप सिंह रंधावा, विक्की रंधावा, दलजीत सिंह रंधावा, सुखदेव सिंह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here