साखर उत्पादन वाढविण्यासाठी तज्ज्ञ शोधणार उपाययोजना

गोरखपूर : प्रती क्विंटल साखर उतारा वाढविण्यासाठी पिपराईच साखर कारखान्याने मदन मोहन मालवीय तंत्रज्ञान विद्यापीठाची मदत घेतली आहे. एमएमएमयूटीचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या एका गटाकडून समुहाच्या कारखान्यात तांत्रिक पाहणीसह उसाच्या प्रजातीचेही परीक्षण केले जाणार आहे.

तीन वर्षापूर्वी सुरू झालेल्या पिपराईच साखर कारखान्याचा साखर उतारा १० टक्क्यापेक्षा कमी आहे. यामुळे कारखान्याला आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना ऊस दरही उशीरा मिळत आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात कारखान्याच्या सर व्यवस्थापकांनी प्रशासनासोबत चर्चा केली होती. त्यानंतर प्रशासनाने याबाबत एमएमएमयूटीशी चर्चा केली होती. विद्यापीठाच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या समुहाने संशोधनाची तयारी सुरू केली आहे. तेथील तांत्रिक बाबींसह उसाची प्रजाती,लागण आदींबाबतही माहिती खघएतली जात आहे. खासगी कारखान्यांचा साखर उतारा ११ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

गोरखपूर विभागातील नऊ कारखान्यांपैकी पाच कारखाने कुशीनगर जिल्ह्यात आहेत. याशिवाय महराजगंज येथे दोन, गोरखपूर व देवरिया येथे प्रत्येकी एक कारखाना आहे. कुशीनगरमधील हाटा, कप्तानगंज, रामकोला, सेवरही कारखान्याचा उताराा ११ टक्के आहे. मात्र, गोरखपूरमधील पिपराईच कारखान्याचा उतारा १० टक्क्यांपेक्षा अधिक नाही. त्यामुळे कारखान्याला आर्थिक फटका बसत आहे. कारखान्याचे महा व्यवस्थापत जितेंद्र श्रीवास्तव यांनी सांगितले की कारखान्यात एमएणएमयूटीचे पथक संशोधन करीत आहे. त्यानंतर उतारा वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here