ऊस दर ५००० रुपये प्रती टन करण्याची शेतकऱ्यांची मागणी

कलबुर्गी : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कलबुर्गी येथे ऊस दर प्रती टन ५००० रुपये करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले. Karnataka Pranth Raitha Sangha (KPRS) च्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी उपायुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व केपीआरएसचे नेते शरणबसप्पा ममशेट्टी आणि ऊस उत्पादक सिद्धराम धनूर, सुभाष जेवर्गी यांनी केले. केंद्र सरकारने जाहीर केलेली एफआरपी ऊस उत्पादनासाठी पुरेशी नाही. केंद्र सरकारने ९.५ टक्के उताऱ्यासाठीची एफआरपी ५००० रुपये केली पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे गेल्या हंगामात गाळप केलेल्या ऊसाची थकबाकी त्वरीत देण्याची मागणी केली आहे. याबाबत सरकारने कारखान्यांना निर्देश द्यावेत अशी अपेक्षा आहे. साखर कारखान्यांनी इथेनॉल आणि इतर उपपदार्थांपासून मिळणारा नफाही शेतकऱ्यांना दिला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here