बिहार: नवगछियामध्ये ९५ कोटी रुपयांच्या इथेनॉल युनिटची पायाभरणी

भागलपूर : राज्याचे उद्योग मंत्री सैयद शहनवाज हसे यांनी नवगछियामध्ये ७.३ एकर क्षेत्रातील ९५ कोटी रुपये खर्चाच्या इथेनॉल उत्पादन युनिटची पायाभरणी केली. ही योजना अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती तसेच समाजातील मागास प्रवर्गातील उद्यमशीलतेला गती देण्यासाठी मुख्यमंत्री योजने अंतर्गत राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना मंत्री सैयद शहनवाज हुसैन म्हणाले, इथेनॉल युनिटसाठी विभागातील मक्क्याचा वापर केला जाईल. त्यामुळे या भागातील औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे. ते म्हणाले, याइथेनॉल युनिटमुळे स्थानिक स्तरावरील योग्य, कुशल, अर्ध-कुशल, अकुशल कामगारांना रोजगाराच्या संधी मिळतील. प्रस्तावित युनिटमधून प्रती दिन ६०,००० लिटर इथेनॉलचे उत्पादन होणार आहे. इथेनॉलचा वापर औषधे, पॉलिश, सौंदर्य प्रसाधने आणि इतर उत्पादनांच्या निर्मितीसाठी केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here