भारतात २०२२ मध्ये मान्सून सामान्य राहणार : स्कायमेटचा अंदाज

नवी दिल्ली : भारतात यावर्षीचा मान्सून सामान्य राहील असा अंदाज खासगी हवामान एजन्सी स्कायमेट वेदर सर्व्हिसेसने (Skymet Weather Forecast) व्यक्त केला आहे. यावर्षी ९६ ते १०४ टक्के इतका सरासरी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सूनचा विस्तृत अभ्यास सुरू असून त्यासाठी आकडेवारी जमा केली जात आहे. एप्रिल महिन्यात याचे पू्र्वानुमान अहवाल जाहीर केला जाणार आहे.

स्कायमेटने म्हटले आहे की, ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यासाठी एकत्र केलेल्या आकडेवारीचे आताच सादरीकरण करणे हे घाईचे ठरेल. मात्र, सुरुवातीचा अंदाज व्यक्त करण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी ठरेल. मान्सून कधी येईल आणि कधी परत जाईल याबाबत पुर्वानुमान व्यक्त करण्याची घाई योग्य नाही. मात्र, गेल्या दोन वर्षापासून मान्सूनवर ला नीनाचा प्रभाव होता. तो आता कमी होत आहे. याचा अर्थ २०२२च्या सुरुवाताला ला नीना असेल. त्यानंतर मान्सून सामान्य स्थितीत येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here