इथेनॉल युनिटसाठी १५ किलोमिटरचा नियम रद्द करण्याचा राज्य सरकारकडे आग्रह

म्हैसूर : स्टेट शुगरकेन ग्रोवर्स असोसिएशन तर्फे आयोजित ऊस उत्पादकांच्या विभागीय बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकरी संजीव माने यांनी सांगितले की, जर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने शेतीचे शास्त्रीय मॉडेल स्वीकारले, तर त्यांना चांगले उत्पादन मिळू शकते. ऊस हे कर्नाटकचे मुख्य व्यावसायिक पिक आहे. राज्यात प्रती एकर ६० ते ८० टन ऊसाचे उत्पादन घेतले जाते. काही शेतकऱ्यांनी तर १०० टन ऊस उत्पादन मिळवले आहे.

माने यांनी शेतकरी प्रती एकर १६० टन उत्पादन कसे घेऊ शकतात याची माहिती दिली. ते म्हणाले, २०१७ मध्ये मी २०० टन प्रती एकर उद्दिष्ट ठेवून काम सुरू केले. मी १६८ टनापर्यंत पोहोचू शकलो. यावेळी State Sugarcane Growers Associationचे अध्यक्ष कुरबुर शांता कुमार यांनी सांगितले की, सरकारने साखर कारखान्यांना कोणत्याही निर्बंधांशिवाय इथेनॉल उत्पादन युनिट सुरू करण्याची परवानगी दिली पाहिजे. सरकारने यासाठी १५ किलोमीटरची अट रद्द करावी असे ते म्हणाले. ऊस पिक शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे. मात्र, शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही हे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here