उत्तर प्रदेशातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात

बलरामपूर : उत्तर प्रदेशमध्ये २०२१-२२ मधील साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अनेक साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस समाप्त होण्याच्या मार्गावर आहे. यामध्ये बजाज साखर कारखान्याचा समावेश आहे.
याबाबत लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, बजाज शुगर मिल इटई मैदा येथील कारखान्याच्या गेटवर शेतकऱ्यांच्या गेटवर मोफत वजन सुविधा करून देण्यात आली आहे. सहकारी ऊस समिती उतरौलाचे ऊस विभागाचे सचिव के. पी. मिश्रा यांनी सांगितले की, साखर कारखान्याचा हंगाम २०२१-२२ मध्ये ऊस पुरवठा २० फेब्रुवारीपर्यंत करण्यात आला. कारखान्याचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे अद्याप ऊस शिल्लक आहे, त्यांनी आपला ऊस तात्काळ तातडीने ऊस खरेदी केद्रांवर पाठवावा.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिलेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत उत्तर प्रदेशात ११७ कारखाने सुरू आहेत. तर ३ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. राज्यात या कारखान्यांनी १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ५९.३२ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. तर गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत १२० कारखान्यांनी ६५.१३ लाख टन साखर उत्पादीत केली होती. गेल्यावर्षी ३ कारखान्यांनी या कालावधीपर्यंत गाळप बंद केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here