आता ऊस तोडणी होणार सुलभ, शेतात पोहोचतोय केन हार्वेस्टर

यमुनानगर : विभागातील गाव रोडछप्परमध्ये शुगर केन हार्वेस्टरचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. मशीनद्वारे होणारी ऊस तोडणी पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. शेतकरी रण सिंह यांच्या शेतात याचे आयोजन करण्यात आले होते. अंबली येथील शेतकरी रमणदीप सिंह यांनी या केन हार्वेस्टरची खरेदी केली आहे. त्याची किंमत ९५ लाख रुपये असून कृषी तथा शेतकरी कल्याण विभागने त्यावर ६० टक्के अनुदान दिले आहे. शेतकरी तथा कृषी कल्याण विभागाचे उपसंचालक डॉ. जसविंदर सैनी यांनी सांगितले की, राज्यात तीन आणि यमुनानगरमध्ये एका शेतकऱ्याला हे मशीन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. एका दिवसात मशीनद्वारे ५ ते ७ एकरमधील उसाची तोडणी केली जाते. त्यातून वेळ आणि पैशांचीही बचत होते असे सांगण्यात आले.

यमुनानगर परिसरात साधारणतः ८५ हजार एकर क्षेत्रात ऊस पिक घेतले जाते. ऊस तोडणी मशीनबाबत सांगताना डॉ. जसविंदर सैनी म्हणाले, मशीन ऊस मुळापासून तोडते. त्यामुळे त्याचा फुटवा चांगला होतो. हे मशीन ऊसाचा पाला चांगला कापत असल्यामुळे पाला जाळावा लागत नाही. यातून प्रदूषण होत नसून पाला जमिनीत मिसळल्यानंतर खत होऊन जमिनीची शक्ती वाढते. यमुनानगर ही प्लायवूड इंडस्ट्री असल्याने येथे नेहमीच मजुरांची टंचाई भासते. हरियाणातील ऊस तोडणीसाठी बहुतांश मजूर बिहार आणि उत्तर प्रदेशातून येतात. ऊस तोडणीसाठी प्रती क्विंटल ४५ ते ५० रुपये आकारले जातात. एक मजूर दिवसात ६० ते ८० क्विंटल ऊस तोडतो. अनेकवेळा मजूर नसल्याची समस्या भासते. ती आता दूर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here