फिलिपाईन्स : २ लाख मेट्रिक टन साखर आयातीच्या निर्णयाचे फूड मेकर्स कंपन्यांकडून समर्थन

मनिला : कमी साखर उत्पादन झाले असल्याने फिलिपाईन्स चिंतेत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. फिलिपाईन्स चेंबर ऑफ फूड मॅन्युफॅक्चरर्सने (पिसीएमएफआय) आगामी कमी पुरवठ्याच्या शक्यतेने २ लाख टन प्रक्रिया केलेली साखर आयात करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. पिसीएमएफआयने शुगर रेग्युलेटरी अॅडमिनिस्ट्रेशनकडून (एसआरए) एक लाख मेट्रिक टन प्रक्रिया केलेली साखर आणि एक लाख मेट्रिक टन बॉटलर्स ग्रेड रिफाइंड साखर आयात करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. पीसीएफएमआयने सांगितले की, रिफांईंड साखरेच्या कमतरतेमुळे खाद्यपदार्थ उत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अशा प्रकारे तात्काळ साखर आयात करण्याची गरज आहे. काही खाद्यपदार्थ उत्पादकांनी सांगितले की, त्यांच्याकडे असलेली रिफाइंड साखरेचा साठा मार्चच्या सुरुवातीला संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

१०७ सदस्य असलेली पिसीएमएफआय संस्था दूध, कॉफी, बेकरी उत्पादने आणि नुडल्स यांसारख्या आवश्यक वस्तूंचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते. पिसीएमएफआयने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सात साखर उत्पादक रिफायनरीपैकी केवळ चार प्रमुख उत्पादक कंपन्या खाद्यपदार्थ निर्मात्यांना पुरवठा करण्यास सक्षम आहेत. पिसीएमएफआयने सांगितले की, डिसेंबर महिन्यात आलेल्या ओडेट वादळामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे रिफायनरी आणि रिफाइंड स्टॉकचे नुकसान झाले असल्याचे या पुरवठादारांनी आमच्या सदस्यांना सूचित केले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर परिणाम झाला आहे. एसआरएकडील नवीन आकडेवारीनुसार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रिफाइंड साखरेचा किरकोळ दर १८ टक्के वाढून पी ५९ प्रती किलो झाला आहे. जो गेल्या वर्षी याच काळात पी ५० प्रती किलो होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here