महाराष्ट्र : साखर कारखान्यांचे गाळप सुरूच; अतिरिक्त उसाचे संकट

मुंबई : महाराष्ट्रात गळीत हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मात्र, अद्याप राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस पीक शेतातच उभे आहे. जसजसा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचत आहे, मात्र महाराष्ट्रातील साखर कारखाने आणि शेतकऱ्यांसमोर अतिरिक्त उसाची समस्या निर्माण झाली आहे. गेल्या साखर हंगामात २४ फेब्रुवारी अखेर राज्यात केवळ १८९ साखर कारखाने सुरू होते. या कारखान्यांनी ८०.४७१ मिलियन मेट्रिक टन ऊस गाळप केला होता. या हंगामात आतापर्यंत १९७ साखर कारखाने सुरू आहेत. त्यांनी ९१.६०७ मिलियन मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे. मात्र आणखी खूप ऊस शिल्लक आहे.

द हिंदू बिझनेस लाइन मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार आतापर्यंत किमान ३० लाख टन ऊस शेतातच आहे. राज्यात गेल्या हंगामात २४ फेब्रुवारी अखेर साखर कारखान्यांनी ८.३२७ मिलियन टन साखर उत्पादित केली होती. तर या हंगामात आतापर्यंत ९.३८ मिलियन टन साखर उत्पादन झाले आहे. साखर कारखान्यांनी आपली दैनंदिन गाळप क्षमता वाढवली आहे. काही साखर कारखान्यांच्या प्रमुखांच्या म्हणण्यानुसार आता आणखी हंगाम पुढे सुरू ठेवणे शक्य नाही. साखर कारखान्याशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारने वस्तू स्थिती जाणून घेतली पाहिजे. गाळप करण्याची कारखान्यांची ठराविक क्षमता आहे. त्या मर्यादेपर्यंत गाळप होऊ शकते.

साखर कारखानदारांनी सांगितले की अनेक कारखान्यांनी आपली दैनंदिन गाळप क्षमता ओलांडली आहे. आता हा उद्योग ताणला जात आहे. मात्र हे दीर्घकाळ सुरू ठेवणे शक्य नाही. कारखान्यांना गाळप हंगाम समाप्तीची घोषणा करावी लागेल. पुढील महिन्याच्या अखेरीस फक्त काही मोठे कारखाने सुरू राहतील.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी यापूर्वी आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळप पूर्ण न करता गळीत हंगाम संपवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. हंगाम बंद करण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घेण्याची अट घातली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here