बिसलपूर : बजाज हिंदूस्थान साखर कारखाना मकसूदपूरच्या अध्यक्षांनी रविवारी नोटीस जारी करुन साखर कारखाना एक मार्चपासून बंद करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत जिल्हा ऊस अधिकारी जितेंद्र शर्मा यांनी सांगितले की, बजाज हिंदूस्थान साखर कारखाना, मकसूदपूरच्या कार्यक्षेत्रातील सर्व ऊस संपुष्टात आला आहे. त्यामुळे साखर कारखाना पुढे सुरू ठेवणे हितावह नसल्याचे त्यांनी सांगितले.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस जवळपास पूर्ण गाळप झाला असल्याने अध्यक्षांनी रविवारी नोटीस काढून हंगाम समाप्तीची माहिती दिली आहे. नोटिशीच्या प्रती कारखान्याचा नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे. तसेच सहकारी ऊस विकास समिती, सर्व ऊस खरेदी केंद्रे, ऊस विकास परिषदेच्या कार्यालयात लावली आहे. जर शेतकऱ्यांकडे ऊस शिल्लक असेल तर त्यांनी एक मार्चपूर्वी साखर कारखान्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतरच्या उसाची जबाबदारी घेतली जाणार नाही असेही बजावण्यात आले आहे