कोलंबो : श्रीलंकेत ऊस दर वाढ करण्याच्या मागणीस गती आली आहे. अधिकाऱ्यांना सेवानागला ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊसाच्या दरवाढीचा प्रस्ताव मिळाला आहे. सेवानागला साखर कारखान्याने सद्यस्थितीत ऊस दरात वाढ करणे शक्य नसल्याचा दावा केला आहे असे सूत्रांनी सांगितले.
सेवानागलामधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले की, प्रती किलो २ रुपये दरवाढ झाली नाही, तर यापुढे ऊस शेती सुरू ठेवणे अशक्य होणार आहे. शेतकरी ऊस उत्पादनापासून दूर जातील. सेवानागला ऊस उत्पादक शेतकरी महासंघाने अलिकडेच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सेवानागला लंका शुगर कंपनी जोपर्यंत एक टन ऊसासाठी २००० रुपयांची वाढ करत नाही, तोपर्यंत कंपनीला ऊस पुरवठा केला जाणार नाही, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.