नवी दिल्ली : युक्रेन आणि रशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. क्रूड तेलाच्या दरामध्ये जागतिक मानक ब्रेंट क्रूडचा दर ५.४६ टक्क्यांनी वधारून १०३.२८ डॉलर प्रती बॅरल झाले आहेत. तर सोमवारी आंतराष्ट्रीय बाजारात मे महिन्याचा ब्रेंट क्रूड फ्यूचरचा दर १ टक्क्यांनी वाढून ९८.९० डॉलर प्रती बॅरलवर पोहोचला होता.
रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात इंधन आणखी महाग होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. भारतात सध्या इंधनाचे दर स्थिर आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर यामध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल १०९.९८ तर डिझेल ९४.२४ रुपये प्रती लिटरने मिळत आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०४.६७ आणि डिझेलची ८९.७९ रुपये प्रती लिटर दराने विक्री केली जात आहे. चेन्नईत पेट्रोल १०१.४० तर डिझेल ९१.४३ रुपये प्रती लिटर आहे. बेंगळुरुमध्ये पेट्रोल १००.५८ रुपये तर डिझेल ८५.०१ रुपये प्रती लिटरने दिले जात आहे. तर भोपाळमध्ये पेट्रोलची विक्री १०७.२३ रुपये आणि डिझेल ९०.८७ रुपये प्रती लिटर दराने होत आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात. सकाळी सहा वाजता ते अपडेट केले जातात. पेट्रोल-डिझेलचे नवे दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP यासोबत आपल्या शहराचा कोड नंबर लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करू शकतात. BPCLचे ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर मेसेज करून माहिती मिळवू शकतात. तर HPCL चे ग्राहक HPPrice लिहून ९२२२२०११२२ या क्रमांकावर मेसेज पाठवून दर जाणून घेऊ शकतात.