उत्तर प्रदेश निवडणूक : डिझेलला अनुदान, बियाणे खरेदीसाठी कर्जाची ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

कुशीनगर : जिल्ह्यातील तीन लाखांहून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मतदानापूर्वी डिझेलवर अनुदान आणि बियाणे खरेदीसाठी कर्जाची मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षात सर्वाधिक पावसामुळे त्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे. जिल्ह्यातील पिकांचा मोठा भाग नुकसानीला सामोरा गेला आहे.

एएआयमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पिक कमी असल्याने किसान क्रेडिट कार्डअंतर्गत घेतलेले कर्ज चुकविण्यात शेतकरी अपयशी ठरले आहेत. त्यांना आता केसीसी योजनेअंतर्गत कर्ज मिळणार नाही. राज्यातील पूर्वहंगामी ऊसाचा दर ३५० रुपये क्विंटल आहे. तर नंतरच्या टप्प्यातील उसाला ३४० प्रती क्विंटल दर आहे. खते आणि किटकनाशकांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत कुशीनगर मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आले होते. भाजपचे रणनिकांत मणी त्रिपाठी यांनी बसपाच्या राजेश प्रताप राव ऊर्फ बंटी भय्या यांचा ४८१०३ मतांनी पराभव केला होता. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजय कुमार दुबे यांनी सपाच्या एन. पी. कुशवाहा ऊर्फ नथुनी प्रसाद कुशवाहा यांचा पराभव केला होता. आता भाजपचे पी. एन. पाठक यांच्यासमोर सपाचे राजेश प्रताप राव यांचे आव्हान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here