युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी रशियाकडून ॲडव्हायजरी जारी

युक्रेनमध्ये भारतीयांच्या सुरक्षेबाबत चिंतेत असलेल्या कुटुंबांना, भारत सरकार आणि तेथे अडकलेल्या लोकांसाठी दिलासादायक माहिती हाती आली आहे. रशियाने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय लोकांच्या मदतीसाठी ॲडव्हायजरी जारी केली आहे. लोकांनी पॅनिक होऊ नये. रशिया तुमची सर्वोतोपरी मदत करेल असे त्यांनी म्हटले आहे.

याबाबत एबीपीलाइव्ह डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, रशिया भारताचा जुना मित्र आहे. भारताने युक्रेनमध्ये सुरू असलेल्या वादामध्ये अमेरिका तसेच इतर युरोपीय देशांच्या दबावानंतरही रशियाची साथ सोडलेली नाही. भारताने यामध्ये तटस्थ भूमिका घेतली आहे. यूएनमध्ये दोनवेळा झालेल्या मतदानात भारताने सहभागी न होऊन आपल्या मैत्रीची ओळख करुन दिली आहे. आता रशियानेही दोस्ती निभावत भारतीय लोकांसोबत ॲडव्हायजरी जारी केली आहे. काल युक्रेनच्या पोलिसांकडून भारतीयांना मारहाण करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. भारतीय विद्यार्थ्यांनीही खाण्या-पिण्याची चिंता असल्याचा व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यानंतर सरकारने चार केंद्रीय मंत्र्यांची टीम युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये पाठवली. यादरम्यान रशियाने पुढे येत भारतीयांच्या मदतीचा हात दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here