पाटणा : बिहार सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात १५१ इथेनॉल प्लांट निर्माण करण्याबाबत सूचावाच केले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाने आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. तसेच रोजगार निर्मिती होईल. दुसरीकडे व्यापार, वाणिज्य आणि उद्योगातील घटकांनी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये उद्योगांकडून गुंतवणूकीसाठी १६४३.७४ कोटी रुपयांच्या बजेट मंजुरीबाबत संमिश्र प्रतिक्रीया दिली आहे.
याबाबत टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, बिहार चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (बीसीसीआय) अध्यक्ष पी. के. अग्रवाल यांनी सांगितले की, यामध्ये आणखी उद्योगांचा समावेश असणे गरजेचे होते. ते म्हणाले, औद्योगिक विकास निधी बनविण्याची आणि लँड बँक ही कन्सेप्ट पुढे चालविण्याची गरज आहे. अग्रवाल यांनी सांगितले की, अर्थसंकल्पात १५१ प्लांट स्थापन करण्याची बाब सकारात्मक आहे. मात्र काही उद्योजकांच्या मते हे बजेट उद्योग, व्यापार क्षेत्राच्या अपेक्षेनुसार नाही. आमच्या अनुमानानुसार, उद्योगांसाठी मंजूर केलेला १६४३ कोटी रुपयांचा निधी कमी आहे. उद्योगांसाठी किमान ३०००-४००० कोटी रुपयांच्या निधीची अपेक्षा होती.