रशिया-युक्रेन युद्ध : एअरस्पेसवरील बंदीमुळे पुरवठ्याची साखळी धोक्यात, भारतावरही परिणाम शक्य

युक्रेन आणि रशियांदरम्यानच्या युद्धाचे परिणाम आता इंडस्ट्रीवर पडताना दिसत आहे. अनेक विभागात आता थेट परिणाम दिसून लागले आहेत. विमान उड्डाण क्षेत्रही यामध्ये एक आहे. त्याला अधिक फटका बसला आहे. अनेक देशांनी रशियाच्या विमानांना आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्याबदल्यात रशियानेही त्या देशांना बंदी घातली आहे. यामुळे विमानांचा प्रवास करण्याचा रस्ता आता दूर झाला आहे. युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याविरोधात कॅनडा आणि युरोपिय संघाने एअरस्पेस बंद केली आहे. आता अमेरिकेनेही आपले हवाई क्षेत्र रशियासाठी बंद केले आहे. ही बंदी रशियन एअरलाइन्ससह रशियातील श्रीमंतांच्या खासगी विमानांनाही लागू असेल. अशाच पद्धतीने कार्गो विमानसेवेवरही परिणाम होईल. दुसरीकडे अमेरिकेने रशियाच्या विमानांना पुढील २४ तासात आपल्या हवाई क्षेत्रातून निघून जाण्यास सांगितले आहे.

याबाबत आजतक डॉट इनवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, विश्लेषकांच्या मते अमेरिकेच्या या बंदीमुळे रशियावर फारसा परिणाम होणार नाही. कारण युरोप आणि कॅनडाचे हवाई क्षेत्र बंद होण्याने रशियाला आधीच अमेरिकेचा रस्ता बंद झाला आहे. अमेरिकेच्या घोषणेनंतर आता रशियानेही अशीच प्रती घोषणा केली आहे. त्यामुळे रशियाचा तोटा होार आहे. अमेरिकेची एअरलाइन्स फेडएक्स आणि युपीएस हे दोन्ही कार्गो रशियातून पुढे जातात. त्यांच्यावर परिणाम होणार आहे. रशियाच्या बंदीमुळे भारत-अमेरिकेच्या विमान सेवेवरही परिणाम होणार आहे. अमेरिकन एअरलाइन्सची अनेक उड्डाणे दिल्ली-न्यूयॉर्क फ्लाइट रशियाच्या अवकाशातून जातात. आता त्यांना लांबचा मार्ग स्वीकारावा लागेल. युरोपलाही याचा मोठा परिणाम होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here