हरियाणा : अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मिळणार मदत

चंडीगड : जे शेतकरी पुरामुळे आपल्या शेतामध्ये पिकांचे उत्पादन घेऊ शकले नाहीत, त्यांना हरियाणा सरकार नुकसान भरपाई देईल अशी माहिती हरियाणाचे उप मुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात दिली. मनोहर लाल खट्टर यांनीही राज्यातील काही जिल्ह्यात अलिकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या २०२१-२२ मधील रब्बी हंगाातील पिकांच्या नुकसानभरपाईची पाहणी मोहीम १ मार्चपासून सुरू केले आहे, असे सांगितले.

मंत्री दुष्यंत यांनी सांगितले की, ५ मार्च २०२२ पर्यंत गेल्या खरीप पिकांची नुकसान भरपाई सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. जोरदार पाऊस, पूर, किडींचा हल्ला यामुळे खरिपातील कापूस, मुग, भात, बाजरी, ऊस यापिकांचे नुकसान झाले होते. त्याच्यासाठी राज्य सरकारने विशेष तरतुद केली होती. १२ जिल्ह्यातील उपायुक्तांनी दिलेल्या अहवालानुसार, ९ लाख १४ हजार १३९ शेतकऱ्यांना याचा फटका बसला. त्यांना ५६१ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. आणि २४,३२० शेतकऱ्यांना भरपाईच्या आधी प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण सुरू करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री दुष्यंत यांनी ज्या १२ जिल्ह्यांचा उल्लेख केला त्यामध्ये कर्नाल, पलवल, नुंह, गुरुग्राम, हिस्सार, सिरसा, फतेहाबाद, चरखी दादरी, भिवानी, रोहटक, सोनीपत, झज्जर यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here