हंगाम २०२१-२२ : इस्माकडून साखर उत्पादन, निर्यात आढाव्याचा अहवाल सादर

नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशन्सने (इस्मा) दिलेल्या माहितीनुसार २०२१-२२ या हंगामात १ ऑक्टोबर २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत ५१६ साखर कारखान्यांनी कामकाज सुरू केले आहे. गेल्या हंगामात २८ फेब्रुवारी २०२१ या काळात ५०३ साखर कारखाने सुरू होते. देशभरात २७ साखर कारखान्यांनी २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत आपले कामकाज समाप्त केले आहे. गेल्या वर्षी ९९ साखर कारखान्यांनी २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत आपले गाळप बंद केले होते. देशात या ५१६ साखर कारखान्यांनी २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत एकूण २५२.८७ लाख टन साखर उत्पादन केले आहे. तर गेल्या हंगामात २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ५०३ साखर कारखाने २३४.८३ लाख टन साखर उत्पादन घेतले होते.

महाराष्ट्रात फेब्रुवारीअखेर ९७.१५ लाख टन साखर उत्पादन

महाराष्ट्रात २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत साखरेचे उत्पादन ९७.१५ लाख टन झाले. तर गेल्या वर्षी या कालावधीत ८४.८५ लाख टन साखर उत्पादन झाले होते. सध्या २०२१-२२ या हंगामात सर्व १९७ साखर कारखाने अद्याप सुरू आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत १३ कारखान्यांनी आपले कामकाज बंद केले होते. २८ फेब्रुवरी २०२२ पर्यंत १९७ कारखाने गाळप करीत आहेत. तर गेल्या वर्षी २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत १७६ कारखाने गाळप करीत होते.

उत्तर प्रदेश, कर्नाटकमध्ये गळीत हंगाम अंतिम टप्प्यात

उत्तर प्रदेशात सध्या ११२ साखर कारखाने सुरू आहेत. तर ८ कारखान्यांनी आपले गाळप बंद केले आहे. यातील बहूतांश कारखाने राज्याच्या पूर्व विभागातील आहेत. राज्यात या कारखान्यांनी २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ६८.६४ लाख टन साखर उत्पादन केले आहे. तर २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत एवढ्याच साखर कारखान्यांनी ७४.२० लाख टन साखर उत्पादन घेतले होते. तर गेल्या वर्षी या तारखेपर्यंत ११ कारखान्यांचे कामकाज संपु्ष्टात आले होते. कर्नाटकमध्ये २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ७२ साखर कारखान्यांनी हंगामात भाग घेतला आणि ५०.८४ लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. तर गेल्या वर्षी २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ६६ कारखान्यांनी ४०.८३ लाख टन साखर उत्पादन घेतले होते. ७२ पैकी ७ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. गेल्यावर्षी या कालावधीत ६६ पैकी ५२ कारखान्यांचे गाळप २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत समाप्त झाले होते.

गुजरातमध्ये ७.९३ लाख टन साखर उत्पादन

गुजरातमध्ये सध्या १५ कारखाने सुरू आहेत. आणि २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ७.९३ लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. गेल्या वर्षी एवढेच साखर कारखाने सुरू होते. तर २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत एका कारखान्याचे गळीत बंद झाले होते. आणि ७.४९ लाख टन साखर उत्पादन झाले होते. तामिळनाडूत २६ साखर कारखान्यांनी २०२१-२२ या हंगामात २६ कारखान्यांद्वारे ३.२२ लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणासह उर्वरीत राज्ये बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, ओडिसा यांनी २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत एकूण २३.७८ लाख टन साखर उत्पादन केले आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये प्रत्येकी एक, बिहारमध्ये ५ आणिपंजाबमध्ये ४ कारखान्यांचा गळीत हंगाम पूर्ण झाला आहे.

साखर उत्पादन ३३३ लाख टन होण्याची अपेक्षा

‘ISMA’ने आपल्या दुसऱ्या अनुमानामध्ये ११७ लाख टनाच्या तुलनेत महाराष्ट्रात २०२१-२२ या हंगामात साखर उत्पादन १२६ लाख होण्याची शक्यता वर्तवली आहे. इथेनॉलसाठी उसाचे डायव्हर्शन यात समाविष्ट आहे. अशाच पद्धतीने कर्नाटकमध्ये आता ५५ लाख टन साखर उत्पादनाची शक्यता आहे. तर युपीसह इतर राज्यांत फारशा बदलाची अपेक्षा नाही. त्यांच्याकडे १५२ लाख टन साखर उत्पादन होईल. २०२१-२२ या हंगामात भारतात साखरेचे उत्पादन ३३३ लाख टन होण्याची अपेक्षा आहे. तर ३४ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वापरली जाईल.

७५ लाख टन साखर निर्यातीची शक्यता

निर्यातीच्या आघाडीवर आतापर्यंत ६० लाख टनाहून अधिक करार करण्यात आले आहेत. त्यापैकी ४२ लाख टन साखर फेब्रुवारी २०२२ पर्यंत निर्यात केली गेली असण्याचा अंदाज आहे. मार्च २०२२ मध्ये १२ ते १३ लाख टन साखर निर्यातीची शक्यता आहे. त्यामुळे एकूण ५४-५५ लाख टन साखर निर्यात होईल. २०२१-२२ हंगामासाठी जवळपास १.९३ लाख टन जागतिक साखर टंचाईचे संकेत देणाऱ्या आयएसओचा अहवाल आणि भारतीय साखर खरदेकडे असलेला निर्यातदारांचा ओढा पाहता इस्माने साखर आधीपेक्षा जास्त होण्याची शक्यता वर्तवली आहे. चालू हंगामात ७५ लाख टन साखर निर्यातीची अपेक्षा आहे. आधी ६० लाख टनाचे अनुमान होते.

जानेवारीपर्यंत ९१.२३ लाख टन साखर विक्रीचे अनुमान

साखर कारखान्यांचा अहवाल आणि इस्माच्या अनुमानानुसार जानेवारीअखेर ९१.२३ लाख टन साखर विक्री झाल्याचा अंदाज आगे. गेल्यावर्षी या कालावधीत ८७.६९ लाख टन विक्री झाली हती. याशिवाय सरकारने मार्च २०२२ पर्यंत देशांतर्गत साखर विक्री कोटा यंदा गतवर्षीच्या तुलनेत ६ लाख टन जादा आहे. त्यामुळे इस्माने देशांतर्गत साखरेचा खप २७२ लाख टन होण्याची शक्यता वर्तविली आहे. एक ऑक्टोबर २०२१ रोजी ८२ लाख टनाच्या सुरुवातीचा साठा गृहित धरून २७२ लाख टन देशांतर्गत खप, ७५ लाख टनाची निर्यात आणि ३३३ लाख टन उत्पादन गृहीत धरले तर ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत ६८ लाख टन क्लोजिंग स्टॉक असेल अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here