वेदर अपटेड : पुढील ३ तासात या राज्यांत होणारा जोरदार पाऊस, IMDचा इशारा

तामीळनाडूच्या अनेक जिल्ह्यांत आणि पुदुच्चेरीतील काही ठिकाणी पुढील तीन तासात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. चेन्नईतील विभागीय हवामान विज्ञान केंद्राने ट्वीटरवर ही माहिती दिली आहे. आरएमसीने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, तामीळनाडूतील तिरुवल्लूर, चेंगलपट्टू, मईलादुथुरई, नागपट्टिनम, तंजावूर, तिरुवरुर आणि पुदुकोट्टई जिल्ह्यात तसेच पुद्दूचेरीतील कराईकल भागात एक ते दोन ठिकाणी पुढील तीन तासात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस कोसळेल.

भारतीय हवामान विभागाने ५ मार्च रोजी तामिळनाडू किनारपट्टीवर पावसाचा इशारा दिला आहे. सहा मार्च रोजी तामीळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पावसासोबत काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टी, रायलसीमामध्ये विविध ठिकाणी मध्यम पाऊस कोसळेल, तर सात मार्च रोजी तामीळनाडू, पुद्दुचेरी, कराईकलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस कोसळू शकतो. आठ मार्च रोजी अशीच स्थिती राहील. तर पाच मार्चपासून पश्चिम – मध्य बंगालची खाडी, मन्नारची खाडी, उत्तर तामीळनाडू, पुदुच्चेरी, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ७५ किमीपेक्षा अधिक वेगाने वारे वाहतील असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here