ढाका : साखरेच्या वाढत्या दराने हवालदिल झालेल्या लोकांना दिलासा देण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत संसाधन विभागातील एका वैध नियामक आदेशानुसार – statutory regulatory order (SRO) सरकारने साखरेवरील कमी आयात शुल्काचा लाभ आणखी अडीच महिने देण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, रमजानच्या पवित्र महिन्याआधी बाजार स्थिर ठेवण्यासाठी साखर आयातीवरील सध्याचा २० टक्के टेरिफ लाभ १५ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. या आदेशानुसार, घटवलेल्या टेरिफची सुविधा १ मार्चपर्यंत लागू राहील. यापूर्वी साखर आयातीवर रेग्युलेटरी ड्यूटी ३० टक्क्यांवरुन घटवून २० टक्के करण्यात आली होती. याची मुदत २८ फेब्रुवारी रोजी समाप्त झाली.