चालू आर्थिक वर्षात निर्यात ४१० अब्ज डॉलरवर पोहोचणार : गोयल

नवी दिल्ली : देशाची चालू आर्थिक वर्षातील, २०२१-२२ मधील निर्यात ४१० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकते. वाणिज्य तथा उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी याबाबत शक्यता वर्तविली आहे. गोयल हे असोचेमच्या वार्षिक अधिवेशनात बोलत होते. अडचणी असूनही चालू आर्थिक वर्षात निर्यातीला हा टप्पा गाठता येईल असे ते म्हणाले.

देशातील वस्तूंची निर्यात चालू आर्थिक वर्षाच्या आधीच्या १० महिन्यांत, एप्रिल – फेब्रुवारी या कालावधीत ३७४.०५ अब्ज डॉलर झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात समान कालावधीत ही निर्यात २५६.५५ अब्ज डॉलर होती. यंदा ४५.८० टक्के निर्यात अधिक झाली आहे. गोयल म्हणाले, अशा स्थितीत मला वाटते की आशियाच्या उत्तर भागात तसेच युरोपातील समस्या असतानाही आम्ही ४०० अब्ज डॉलरच्या निर्यातीचे उद्दीष्ट सहजपूर्ण करू. मला अपेक्षा आहे की, आम्ही ४१० अब्ज डॉलरचा टप्पा गाठू. सेवा क्षेत्रातील निर्यात २५० अब्ज डॉलरवर जाईल असे ते म्हणाले. आम्हाला जर ५००० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवायची असेल, तर आम्हाला वस्तू आणि सेवा या दोन्हींची निर्यात प्रत्येकी १००० अब्ज डॉलर असली पाहिजे. ही बाब २५ टक्के असेल तरीही ते पुरेसे होईल. आम्हाला कच्च्या तेलाच्या आयातीला पाठबळ देण्याची गरज आहे असे गोयल म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here