पुणे : सरकार कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल आणि जैव इंधनावर लक्ष केंद्रीत करीत आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्रे मोदी यांनी केले. भारत सरकार पायाभूत सुविधांच्या निर्मितीचे काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. आधीच्या सरकारांनी केलेल्या चुकांची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, सरकार कच्च्या तेलासाठी इतर देशांवर अवलंबून आहे. हे कमी करण्यासाठी इथेनॉल आणि जैव इंधनावर लक्ष दिले जात आहे. पंतप्रधान म्हणाले, प्रदूषणापासून सुटका होण्यासाठी, कच्च्या तेलाच्या आयातीचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी इथेनॉल आणि जैव इंधनावर लक्ष दिले जात आहे. इथेनॉल योजनांचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. सरकार शहरांमध्ये ई वाहने तसेच स्मार्ट ग्रीन ट्रान्स्पोर्टला प्रोत्साहन देत आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. यावेळी मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले.