अमरोहा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १४ दिवसांत ऊस बिले देण्यात यावीत यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान यूनियन-अराजकीयच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. त्याआधी मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांना ऊस बिले मिळालेली नाही, असे अनेक नेत्यांनी सांगितले. शेतकरी आर्थिक अडचणीचा सामना करीत आहेत. विजेचे खांब तुटल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. हे खांब तातडीने बदलावेत. पिकांना पाणी देण्यासाठी तातडीने विज कनेक्शन तातडीने द्यावे, खतांची उपलब्धता वेळेवर व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष नरेश चौधरी म्हणाले की, शेती आणि शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी कृषी समर्थन दराचा कायदा बनविण्याची गरज आहे. जर केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी विश्वासघात केला तर शेतकरी त्याला योग्य ते उत्तर देतील. यावेळी शकील अहमद, प्रदीप चौधरी, झाकिर अली, युद्धवीर सिंह, शाहिद हुसेन, हरवीर सिंह, मदन सिंह, नरेंद्र सिंह, सुबोध गुर्जर, अश्रफ अली, कपिल चौधरी, प्रकाश सिंह, महेंद्र सिंह, नौशाद अली, आशीष चौधरी, मलखान वर्मा, सेवाराम सिंह, कपिल चौधरी, पंचम सिंह, राम सिंह सैनी, महेंद्र सिंह सैनी, धर्मवीर सिंह आदी उपस्थित होते.