Election Results: ५ राज्यांच्या निकालाबाबत जाणून घ्या

उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहण्याची प्रतीक्षा आता संपणा आहे. कोण सत्तेत परतणार आणि कोणाला वनवासात जावे लागणार हे चित्र स्पष्ट होण्यास काही तासांचा अवधी आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल. नेहमीप्रमाणे पोस्टल बॅलटपासूनच मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर ईव्हीएम उघडली जातील. उत्तर प्रदेशात ४०३, पंजाबमध्ये ११७, उत्तराखंडमध्ये ७० आणि गोव्यात ४० जागांवर उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद आहे. ईव्हीएममधून काय निकाल बाहेर पडणार याची सर्वांना प्रतिक्षा आहे.

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि भाजपमध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेस आणि आपमध्ये लढत रंगली आहे. याशिवाय अकाली दल, बसपा, भाजप, कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेससह अनेक आघाड्या मैदानात आहेत. युपीत सपाने यंदा ओमप्रकाश राजभर यांची सुभासपा, केशव मौर्य यांचे महान दल, जयंत चौधरी यांची आरएलडी अशा छोट्या पक्षांशी युती केली आहे.

यूपी, पंजाबसह पाच राज्यांची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होईल. याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकृत http://www.eci.gov.in यावर सकाळी आठ वाजल्यापासून मिळू शकेल. याशिवाय विविध टीव्ही चॅनल्सनीही निकालाचे अपडेट देण्याची तयारी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here