जौनपूर, उत्तर प्रदेश: सध्या राज्यभरात ऊसाच्या लागवडीचा हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पादनासाठी मार्च महिन्यातच उसाची लागवड करावी. शास्त्रीय पद्धतीने ही लागण करावी. लागण करण्यापूर्वी बियाण्यावर प्रक्रिया करुन घ्यावी. लागवड करताना बियाणे सुरक्षित असेल तरच त्याचा लाभ मिळू शकेल, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
ऊस पिकावरील रोग, किड, जंगली जनावरांपासून होणारे नुकसान पाहता बहुतांश शेतकऱ्यांनी ऊसाची शेती जवळपास बंद केली आहे. विविध कारणांनी ऊस शेतीपासून शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. मात्र, जर शेतकरी वैज्ञानिक पद्धतीने ऊस शेती करतील, तर त्यांना चांगले उत्पादन मिळेल आणि पिकही सुरक्षित राहू शकेल असा सल्ला केव्हीके, बक्शाचे समन्वयक व संशोधक डॉ. सुरेश कुमार कन्नौजिका यांनी दिला.
डॉ. सुरेश कुमार कन्नौजिया म्हणाले, ऊस लागवड करताना चांगल्या बियाण्यांचा वापर करावा, लागणीसाठी ऊस तोडताना त्यावर लाल सड रोगाचा प्रादुर्भाव झाला नसल्याची खात्री करावी. जर काही प्रादुर्भाव दिसून आला, तर असा ऊस नष्ट करावा. उसाच्या तळाकडील जाड भागाच्या तुकड्यापासून गुळाचे उत्पादन होऊ शकते. अशा भागात किडीचे प्रमाण असू शकते. त्यामुळे उत्पादनावर मर्यादा येतात, असे त्यांनी सांगितले. उसाच्या कोसी ११८, २३८ अथवा २३९ या जातींची निवड करावी. बियाणे प्रक्रिया करताना कार्बेन्डेझम दोन ग्रॅम प्रती लिटर, एरिटान २.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी अथवा ट्रायकोडर्मा १० ग्रॅम प्रती लिटर शेणासोबत घोळून मिश्रण करावे. बिजप्रक्रिया केल्याने ऊस उगवणीनंतर किडीचा फैलाव होत नाही. पावसात लाल सड रोगाचाही धोका नसतो. रोगापासून आधीच खबरदारी घेतली तरच शेतकऱ्यांना फायदा मिळेल असे डॉ. कन्नौजिया यांनी सांगितले.