औरंगाबाद : गडचिरोली आणि नंदुरबार जिल्ह्यात ३०,००० लिटर दैनिक क्षमता असलेल्या बांबूपासून इथेनॉल उत्पादनाचा महाराष्ट्रातील पहिला रिफायनरी प्रोजेक्ट स्थापन करण्यात येत आहे. हैदराबाद येथील नागार्जुन ग्रुप आणि लातूर जिल्ह्यातील लोदगा बांबू इंडस्ट्रिज यांदरम्यान शुक्रवारी या प्रोजेक्टचे ॲग्रीमेंट करण्यात आले आहे. लोदगा बांबू इंडस्ट्रिजकडून विधान परिषदेचे माजी सदस्य पाशा पटेल आणि नागार्जुन समुहाचे डॉ. वनव्रत पांडे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पटेल यांनी सांगतिले की या प्रोजेक्टमध्ये बांबूपासून प्रती दिन ३०,००० लिटर इथेनॉल उत्पादन करण्याची पहिली योजना आहे. ते म्हणाले, ही योजना गेल्या चार वर्षामध्ये शेतकऱ्यांची उपजिविका आणि सुरक्षा करण्यासह जागतिक हवामान बदलात बांबूला मुख्य स्त्रोत म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची फलस्वरुप कृती आहे. केंद्र सरकारने २०२५ पर्यंत पेट्रोलसोबत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. इथेनॉल प्लांटसाठी कच्या मालाची गरज पूर्ण करण्यासाठी दरवर्षी १५०० एकरात उत्पादन केलेल्या ६०,००० टन बांबूची गरज भासेल. बांबूवर आधारित इथेनॉल उत्पादन प्रोजेक्टची निवड करण्याबाबत पटेल म्हणाले की, बाबू उत्पादन आपल्या वाढीच्या टप्प्यात कार्बन विघटनासाठी योगदान देईल. आणि जीवाश्म इंधन न जाळल्याने, कार्बन उत्सर्जनात मोठी घट होईल.
Home Marathi Indian Sugar News in Marathi इथेनॉलला बुस्ट : महाराष्ट्रात बांबूपासून इथेनॉल उत्पादनाची योजना