वेल्लोर : ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर आल्यामुळे रानीपेट जिल्ह्यातील वेम्बक्कम आणि पनपक्कम फिरका यांसारख्या लांबवरच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. प्रसार माध्यमातील वृत्तानुसार हे शेतकरी यापूर्वी कामगारांच्या कमतरतेमुळे ऊस लावण करण्याचे धाडस करत नव्हते. आता कांचीपुरम जिल्ह्यातील पझया सेवाराम येथे बंद पडलेल्या साखर कारखान्याशी संलग्न शेतकऱ्यांनीही नव्या यंत्रसामुग्रीची सुरुवात झाल्यामुळे वेल्लोरच्या सुविधांशी स्वतःला जोडून घेण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
शेतकऱ्यांनी सांगितले की, ऊस तोडणीसाठी कामगार मिळणे खूप मुश्किल आहे. जर कामगार उपलब्ध झाले तरी त्यांना चहा, जेवण आदी खर्च करावा लागतो. कामगार सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेतच काम करतात. मात्र, ऊस तोडणीच्या हार्वेस्टरने एका दिवसात ३ एकरपेक्षा अधिक क्षेत्रातील ऊस तोडला जातो. हार्वेस्टरच्या या कामगिरीने शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. तमिलगा विवासयगल संगम रानीपेटचे जिल्हाधअयक्ष सी. एस. मणि यांनी सांगितले की, राज्य सरकारचा कृषी इंजिनीअरिंग विभाग शेतकऱ्यांना भाडे तत्त्वावर मशीनरी देतो, त्यांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी किमान एक हार्वेस्टर खरेदी करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किरकोळ दरात तो उपलब्ध करून देण्याची गरज आहे.