युक्रेन संकट : मॅकडोनल्ड्स, स्टारबक्स, कोका-कोला, पेप्सिकोकडून रशियातील कामकाज बंद

डेट्रॉइट (अमेरिका) : जागतिक स्तरावरील स्टारबक्स, मॅकडोनल्ड, कोका कोला, पेप्सिको, जनरल इलेक्ट्रिक अशा बड्या कंपन्यांनी रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आपला व्यवसाय अनिश्चित काळासाठी थांबवला आहे. मॅकडोनल्ड्सचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस केम्पचिंस्की यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात आम्ही सिद्धांतानुसार युक्रेनमधील लोकांसोबत होणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष करू शकत नाही असे म्हटले आहे.

शिकागो येथील बर्गर च्या दिग्गज कंपनीने सांगितले की, तात्पुरत्या स्वरुपात ८५० स्टोअर्स बंद करण्यात येत आहेत. मात्र, रशियातील आपल्या ६२००० कर्मचाऱ्यांची देणी दिली जातील. आम्ही मॅकडोलन्सड्स ब्रँडसाठी खूप कष्ट केले आहेत. आमच्यासारख्या जागतिक ब्रँडसाठी ही स्थिती खूप आव्हानात्मक आहे असे केम्पचिंस्की यांनी सांगितले. स्टारबक्सने गेल्या शुक्रवारी रशियातील १३० स्टोअर्सपासून होणारा नफा युक्रेनमधील लोकांच्या मदतीसाठी देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. तर कोका कोलाने रसियातील आपला व्यवसाय थांबविण्यात आल्याची घोषणा केली आहे. कोकची भागीदारी कोका-कोला हॅलेनिक बॉटलिंग कंपनीकडे आहे. त्यांचे रशियात १० बॉटलिंग प्लांट आहेत. कोकची यामध्ये २१ टक्के हिस्सेदारी आहे. जनरल इलेक्ट्रिकनेही रशियातील कामकाज थांबवले जात असल्याचे ट्वीट केले आहे. यापूर्वी केएफसी, पिझ्झा हटच्या मूळ कंपनी यम ब्रँड्सने मंगळवारी ७० केएफसी रेस्टॉरंट बंद करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here