लखनौ : उत्तर प्रदेशात कोरोना काळात सरकारने सुरू केलेल्या मोफत रेशन योजनेचे कौतुक झाले आहे. खास करुन दारिद्रयरेषेखाली जीवन जगणाऱ्यांना सरकारच्या निर्णयामुळे मदत मिळाली आहे. या योजनेमुळे गरीबांना रोजचे जेवण मिळणे सुलभ झाल्याचे दिसून आले आहे. आता होळीसाठी सरकारकडून साखर वितरीत केली जात आहे. गरिबांच्या घरांमध्ये त्यामुळे सणाचा गोडवा वाढणार आहे.
याबाबत नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हमीरपूर जिल्ह्यात पावणेदोन लाख गरीबांना गहू, तांदूळ यासोबतच मिठ, तेल, साखर रेशन दुकानात मिळत आहे. ३६०२२ अती गरीब आणि २ लाक ४३०० पात्र रेशनकार्डधारकांना या वस्तू मिळतील. जिल्हा पुरवठा अधिकारी रामजतन रादव यांनी सांगितले की साखरेचे वितरण करण्यात आले आहे. केवळ गरीबांना साखर मोफत दिली जात आहे. फतेहपूर जिल्ह्यात ३६७८९ अंत्योदय कार्डधारक आहेत. त्यांना जानेवारी ते मार्च अशी तीन महिन्यांची साखर दिली जात आहे. प्रती कार्डधारकाला एका महिन्याला एक किलो अशी साखर दिली जात आहे. बांदा विभागात १.२३ लाख गरीबांना होळीपूर्वी तीन – तीन किलो साखर मिळत आहे. चार जिल्ह्यांसाठी सरकारने ३७०१ क्विंटल साखर वितरीत केली आहे. बस्ती, बाराबंकी, महराजगंज, गोंडा, कुशीनगर या जिल्ह्यांतही साखर वितरण सुरू आहे.