Sugarcane Breeding Institute मुळे शेतकऱ्यांना सेंद्रीय ऊस लागवडीसाठी मिळाली मदत

कोईंबतूर : Indian Council of Agricultural Research-Sugarcane Breeding Institute (ICAR-SBI) ने शेतकऱ्यांना सेंद्रीय ऊस उत्पादन आणि गुळाचे मार्केटिंग करण्यास मदत केली आहे. वरप्पलायम, थडगाव येथील शेतकरी आर. रामास्वामी यांनी जैविक शेती करण्याची ईच्छा व्यक्त केली होती. ICAR-SBIने आर. रामास्वामी यांना सीओ ०२१२ आणि सीओ ११०१५ या दोन प्रजातींच्या उसाचा जानेवारी २०२० मध्ये पुरवठा केला. या प्रकारचा ऊस उच्च गुणवत्तेचा गूळ निर्मिती करण्यास उपयुक्त ठरतो. २०१७ पासून रामास्वामी प्रमाणित जैविक शेती करत आहेत. त्यांनी तीन देशी गाईंपासून जमा केलेल्या जैविक खाद्याचा उपयोग करून एक एकर क्षेत्रात ऊस शेती केली होती. गेल्या वर्षी त्यांनी ८२.६५ टन ऊसाचे पिक घेतले होते. त्यापासून १०.२० टन गुळाचे उत्पादन झाले होते. या वर्षी गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्या शेतातील ऊसाची तोडणी सुरू आहे. त्यांच्या शेतामध्येच गुळाचे उत्पादन करण्याची तयारी सुरू आहे. आयसीएआर-एसबीआयचे मुख्य संशोधक टी. राजुला शांती यांनी आर. रामास्वामी यांना ऊस लागवडीत मदत केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here