दौराला : सकौती गावात आयपीएल साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रिंग पिट पद्धतीने ऊस उत्पादन घेण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांना विविध प्रकारे ऊस किडींपासून कसा मुक्त ठेवावा याबाबत माहिती देण्यात आली.
याबाबत लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, सकौती गावातील ऊस उत्पादक शेतकरी राजेंद्र कुमार यांच्या शेतावर आयपीएल साखर कारखान्याकडून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कारखान्याचे केन मॅनेजर यतेंद्र पवार प्रमुख पाहूणे होते. त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेतामध्ये रिंग पीट पद्धतीने ऊस लागण करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, नेहमीच्या पद्धतीने ऊस लागणीच्या तुलनेत जवळपास ३० टक्के अधिक उत्पन्न यापासून मिळते. यासोबतच ऊसाची लागण करताना ट्रायकोडर्माचा वापर करण्याची गरज आहे. तरच उसावरील रोगांपासून बचाव करता येतो. आयपीएल साखर कारखान्याकडून सकौती टाडामध्ये ५० टक्के अनुदानावर सिंगल आय बड कटर मशीन देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.