महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा तडाखा, मुंबईच्या तापमानाचा ६५ वर्षातील उच्चांक

मुंबई : महाराष्ट्रात उष्णतेची लाट वाढू लागली आहे. आज मुंबईसह अनेक जिल्ह्यांत उष्णतेची लाट कायम राहील असे संकेत आहेत. यादरम्यान, मुंबईत तापमानाचा ६५ वर्षांतील नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. १९५६ नंतर मार्च महिन्यात पहिल्यांदाच कमाल तापमान ४१ डिग्री सेल्सिअल नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाण्यात पुढील दोन दिवसांसाठी अॅलर्ट जारी केला आहे. याशिवाय कोकणसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत हवामान साफ राहील असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात हवेचा गुणवत्ता सूचकांक मध्यम श्रेणीत आहे. मुंबईत कमाल ३९ तर किमान २३ तापमन राहील असे अनुमान आहे. आजही उष्णतेच्या लाटा असतील. वायू सूचकांक मध्यम श्रेणीत असेल. तर पुण्यात कमाल तापमान ३७ आणि किमान तापमान १९ डिग्री सेल्सिअस असेल. हवामान साफ राहील. वायू गुणवत्ता सूचकांक मध्यम श्रेणीच १४४ नोंदवले गेले आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान ४१ आणि किमान तापमान २१ डिग्री सेल्सिअस राहील. हवामान साफ राहील. नाशिकमध्ये कमाल तापमान ३७ आणि किमान तापमान १६ डिग्री सेल्सिअस राहील असे अनुमान आहे. तर औरंगाबादमध्ये किमान तापमान २० आणि कमाल तापमान ३७ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here