कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर प्रती बॅरलपेक्षा कमी, पेट्रोलियम कंपन्यांवरील दबाव घटला

नवी दिल्ली : कच्च्या तेलाचे दर आज १०० डॉलर प्रती बॅरलपेक्षा कमी झाले आहेत. भारतातील पेट्रोलियम कंपन्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे. आज सकाळी सव्वासात वाजता, नायमॅक्सवर कच्च्या तेलाच्या दरात ०.५९ डॉलर प्रती बॅरल तेजीनंतर ९७.२४ डॉलर प्रती बॅरलवर दर आला. तर ब्रेंट क्रूडमध्येही ०.७४ टक्के तेजीनंतर दर दर १००.६५ डॉलर प्रती बॅरलवर ट्रेड करीत आहे. सलग दोन आठवडे १०० डॉलर प्रती बॅरलवर राहिल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या बाजारपेठेत मंगळवारी घसरण होऊन ते ९९.८४ डॉलर प्रती बॅरलवर आले. त्यामुळे तेल वितरण कंपन्यांवरील दबाव घटला आहे.

याबाबत एबीपी लाईव्ह डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, तेल वितरण कंपन्यांनी कच्च्या मालाची दरवाढ होऊनही पेट्रोल, डिझेलचे दर वाढवले नाहीत. ब्रेंट क्रूड मंगळवारी सात टक्क्यांनी खालावले. यापूर्वी २८ फेब्रुवारी रोजी हा दर १०० डॉलर प्रती बॅरलवर आला होता. तर सात मार्च रोजी तो १४ वर्षांच्या उच्चांकी स्तरावर, १३९ डॉलर प्रती बॅरलवर पोहोचला. चीनमध्ये पुन्हा कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढल्याचा परिणाम तेलावर झाला आहे. चीन हा कच्च्या तेलाचा मोठा आयातदार देश आहे. अशा स्थितीत मागणीवर प्रतिकूल परिणाम झाला. याशिवाय युक्रेन, रशियातील युद्ध विरामाबाबत चर्चेत प्रगती होत असल्याचे संकेत आहेत. भारतासाठी कच्च्या तेलाचे दर घटणे ही चांगली बाब आहे. त्यामुळे आयात खर्च घटणार असून तेल कंपन्यांवरील दबाव कमी झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here