सहारनपूर : सध्या ऊस लागणीचा हंगाम जोरात सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांनी ०२३८ या प्रजातीच्या बियाण्याची लागवड करू नये असे आवाहन साखर कारखान्यांनी केले आहे. २३८ या बियाण्याऐवजी इतर प्रजातींची लागवड केली जात आहे. जर शेतकऱ्यांनी २३८ प्रजातीचा ऊस लावला तर त्याची जबाबदारी स्वतः शेतकऱ्यांवरच असेल, असे कारखान्याने सांगितले आहे.
शेरमऊ साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी रमेश प्रताप सिंह यांनी सांगतिले की, २३८ प्रजातीच्या ऊसावर रोगाचा अधिक प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना या प्रजातीपासून उत्पादन कमी मिळत नाही. मात्र, कारखान्यांना उसाचा उतारा कमी झाल्याने फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन देणाऱ्या ११८ या प्रजातीची लागवड करावी. जर शेतकऱ्यांकडे बियाणे नसेल तर त्यांनी शेजारच्या शेतांमधून ते मिळवावे. जर उपलब्ध झाले नसल्यास कारखान्याच्या अधिकारी, सुपरवायझरकडे संपर्क साधावा. शेतकऱ्यांसाठी १५०२३ या प्रजातीची रोपेही उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले. ऊस विकास विभागाचे अध्यक्ष घनश्याम सिंह यांनी शेतकऱ्यांना ११८ व १५०२३ या प्रजातीच्या बियाण्याच्या लागवडीबाबत मार्गदर्शन केले.