बगॅसला आग लागल्याने साखर कारखाना बंद, लाखोंचे नुकसान

मेरठ : नानौता विभागातील किसान सहकारी साखर कारखान्यातील बगॅसचा रात्री नऊच्या सुमारास अचानक आल लागली. त्यामुळे कामगारांमध्ये मोठा गोंधळ उडाला. साखर कारखान्याच्या कामगारांनी ही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात अपयश आले. त्यामुळे साखर कारखाना बंद करण्यात आला. कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

विभागातील देवबंग रोडवरील किसान सहकारी साखर कारखान्यात रात्री नऊच्या सुमारास बगॅसला अचानक आग लागली. आग लागल्याने कामगारांमध्ये घबराट पसरली. आग वाढल्याने बगॅस मशीन बेल्ट जळाला. त्यामुळे कारखाना बंद पडला. कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी आगीची माहिती संबंधित विभागाला दिली. मात्र, अग्निशमन विभागाची गाडी वेळेवर पोहोचली नाही. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी पाईपचा वापर करुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग लागल्याची माहिती पोलीस ठाणेदार चंद्रसेन सैनी यांना मिळताच ते फौजफाटा घेऊन घटनास्थळी आले. त्यानंतर दमकल विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here