भारत बंदचा दुसरा दिवस : काही राज्यांत संमिश्र प्रतिसाद

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात पुकारलेल्या देशव्यापी बंदच्या दुसऱ्या दिवशी देशभरातील काही राज्यांमध्ये संमिश्र परिणाम पाहायला मिळाला. सरकारी धोरणांविरोधात केंद्रीय ट्रेड युनियनने बंदची हाक दिली होती. कर्नाटक, तामीळनाडू, केरळसह अनेक राज्यांत ट्रेड युनियन्सनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. याशिवाय दुकानेही बंद राहिली. देशाच्या काही भागात सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. पीटीआयच्या वृत्तानुसार, काही राज्यात सार्वजनिक वाहतूक, बँकिंग सेवा विस्कळीत झाली. सिक्कीम, अरुणाचल प्रदेशमध्ये युनियनच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (एआयटीयूसी) सरचिटणीस अमरजित कौर यांनी सांगितले की, बहुतांश सेक्टरमधील कामगारांनी बंदमध्ये सहभाग घेतला. ग्रामीण भागात चांगली प्रतिक्रीया मिळाली आहे. सोमवारी वीस कोटींहून अधिक लोक बंदमध्ये सहभागी झाले. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार तामीळनाडूत डीएमकेच्या नेतृत्वाखालील ट्रेड युनियन लेबर प्रोग्रेसिव्ह फेडरेशनसह विविध संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला. चेन्नईत युनियनचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. तिरुअनंतपुरममध्ये दुकाने बंद राहिली. कर्नाटकमध्ये कलबुर्गीत सेंटर ऑफ इंडियन्स ट्रेड युनियनसह डाव्या संघटनांनी सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here