कानपूर : इंटरनॅशनल सोसायटी ऑफ शुगर केन टेक्नॉलॉजिस्टद्वारे ‘डी-कार्बोनायझेशनसाठी ऊस, साखर उद्योगाचे योगदान ’ या विषयावर एका वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, कोलंबिया, दक्षिण आफ्रिका, भारत आणि मॉरीशस येथील प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. भारताच्यावतीने एकमेव आमंत्रीत वक्ते, नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. नरेंद्र मोहन यांनी ‘भारतीय साखर उद्योगात सद्यस्थितीत इथेनॉल विविधीकरणच्या माध्यमातून ऊर्जा व्यवस्थापन’ या विषयावर सादरीकरण केले. ते म्हणाले, साखर उद्योगात जीवाश्म इंधनातून मिळणाऱ्या ऊर्जेऐवजी स्वच्छ, हरित आणि नवऊर्जा मिळविण्यासाठी प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता आहे. अशा प्रकारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यात हा उद्योग महत्त्वाची भूमिका निभावू शकतो.
ते म्हणाले, कॉम्प्रेस्ड बायोगॅस, वीज आणि इथेनॉल ही ऊर्जेची तीन वेगवेगळी रुपे आहेत. त्यांच्या निर्मिती साखर उद्योगात विविध उप उत्पादनांच्या माध्यमातून केली जाऊ शकते. त्याची क्षमता वाढविण्याची गरज आहे. प्रा. मोहन यांनी साखर, वीज आणि इथेनॉल उत्पादन युनिटची एकिकृत मॉडेलही सादर केले. यातून केवळ ऊर्जा नव्हे तर आपल्या गरजेसाठी विजेची निर्मिती आणि निर्यातही करता येऊ शकते. ते म्हणाले, आम्ही संलग्न साखर युनिटची गाळप क्षमता लक्षात घेऊन इथेनॉल युनिटची क्षमता वाढवताना सावधतेनेकाम करण्याची गरज आहे. वर्षभर काम करण्यासाठी इथेनॉल युनिटला पुरेशी सामग्री उपलब्ध होण्याची गरज आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी साखर कारखान्यांनी ऊर्जा चक्र व्यवस्थापनासाठी ऑस्ट्रेलियातील मरगूराइट रेनॉफ आणि जर्मनीच्या स्टीफन जाह्नके यांच्याकडूनही सादरीकरण करण्यात आले आहे.