महाराष्ट्रात एक एप्रिलपासून कोरोना निर्बंधातून सूट

मुंबई : महाराष्ट्रात हळूहळू कोरोना महामारीच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ हटविण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य सहकार ३१ मार्चपासून हा निर्णय घेऊ शकते. कोविड टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय होईल. एक एप्रिलपासून सर्व निर्बंध हटवले जातील अशी अपेक्षा आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, कोणते निर्बंध हटवले जातील याची यादी लवकरच प्रकाशित केली जाईल. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे अशा गोष्टी अनिवार्य करण्यात आल्या होत्या. यापैकी काही बाबींचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे.

सार्वजनिक वाहतूक, लोकल ट्रे, बसमध्ये कोविड लस घेतलेल्याच प्रवास करण्यास परवानगीचा नियम होता. हा नियम हटवला जाऊ शकतो. याशिवाय सार्वजनिक ठिकाणांसाठी हा नियम लागू नसेल. महाराट्रातील १४ जिल्ह्यांमध्ये ७० टक्के लोकांनी कोविडचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर ९० टक्के लोकांनी शंभर टक्के डोस घेतले आहेत. लसीकरणाचा वेग पाहता, सरकारकडून आता नागरिकांवर लागू केलेले निर्बंध हटवले जात आहेत. त्याबाबतची प्रक्रिया एक एप्रिलपासून लागू केली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here