अतरौलियातील शेतकऱ्यांना ऊस लागवडीविषयी खास मार्गदर्शन

आजमगड : सठीयाव ऊस विकास परिषदेच्यावतीने कटोही ब्लॉकमधील कोयलसा येथे एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना ऊसाचे अधिक उत्पादन घेता यावे यासाठी कृषी विज्ञान केंद्र कोटवाचे संशोधक डॉ. रसूल मोहम्मद यांनी मार्गदर्शन केले. ऊसाची नवी प्रजाती, उसावर पडणारे रोग, किडींचा नायनाट कसा करावा यासह सेंद्रीय शेतीविषयी विस्तृत माहिती यावेळी देण्यात आली.

सठियावच्या ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षकांनी पंचामृत तसेच उसाची लागण, पूरक पिके, ठिबक सिंचन, मल्चिंग आदींबाबत माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांना नॅनो युरियाची माहिती देण्यात आली. बुढनपूर समितीच्या सचिवांनी फार्म मशीनरीबाबत माहिती दिली. प्रगतशील शेतकरी केदार यादव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ऊस पर्यवेक्षक अच्छेलाल सोनकर, रमेश प्रसाद, शेतकरी गोरे यादव, कमला प्रसाद , कवलधारी, निजामुद्दीन, जय सिंह यादव, ओंकार यादव आदींसह शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here