नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल ब्लेडिंगचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी फ्लेक्स-फ्यूएल व्हेइकल्स (एफएफव्ही/ FFV) गतीने लाँच करण्याची गरज आहे, असे आवाहन इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) केले आहे. खासदारांसाठी केलेल्या सादरीकरणात इस्माचे महासंचालक अविनाश वर्मा म्हणाले, भारताला लवकच एफएफव्हीएसची गरज भासेल. FFVs हे ० ते १०० टक्के इथेनॉल अथवा पेट्रोल अथवा त्यापैकी कोणत्याही मिश्रणावर चालू शकतात. जर एफएपव्हीएस ८० ते ८५ टक्के इथेनॉलवर चालल्यास एफएफव्हीएसची इथेनॉलबाबतची मागणी ई २०च्या चार पटींनी वाढू शकते. त्यासाछी एफएफव्ही महत्त्वपूर्ण आहे. जर आपण २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉलचे उद्दीष्ट पूर्ण करणार असू, तर त्याचे लाँचिंग लवकरात लवकर व्हायला हवे.
केंद्र सरकारने २०२१-२२ या हंगामात १० टक्के इथेनॉल मिश्रण उद्दीष्ट पूर्ण करण्याचा आत्मविश्वास दर्शविला आहे. इस्माने देशभरात तेल वितरण कंपन्यांना (ओएमसी) डेपोत इथेनॉल साठवणूक क्षमता वाढीची मागणी केली आहे. भारतीय रेल्वे नेटवर्कसोबत देशभरात पाइपलाइन टाकून तीन वर्षात १०१६ कोटी लिटर इथेनॉल आणण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान द्यावे. इस्माने ओएमसींच्या घाऊक किरकोळ वितरण पंप, स्टेशनवर आवश्यक बदलांबाबत विचारणा केली आहे. त्यामध्ये इच्च इथेनॉल मिश्री पेट्रोलसोबक शुद्ध इथेनॉलचेही वितरण करता येईल.
वर्मा यांनी आपल्या सादरीकरणा म्हटले आहे की, इतर कोणत्याही पिकाच्या तुलनेत उसापासून ५० ते ६० टक्के अधिक लाभ मिळतो. उसाची एफआरपी बारा वर्षात दु्पट होते. इतर पिकांच्या तुलनेत यातून परतावा अधिक आहे. एफआरपी देण्यास सक्षम होण्यास साखरेचा दर उत्पादन खर्चाची तोंडमिळवणी करण्याइतका असला पाहिजे.
वर्मा म्हणाले, की भारताकडून अतिरिक्त साखर उत्पादन केले जाते. त्यामुळे नियमित रुपात साखर निर्यात करण्याची गरज आहे. ऊसाच्या वाढत्या दरामुळे भारतीय साखरेसमोर अडचणी येतात. त्यामुळे निर्यातीसाठी सरकारी अनुदानावर अवलंबून राहावे लागते. २०२३ नंतर निर्यात अनुदान देणे सरकारला शक्य होणार नाही.