पंजाबच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी टास्क फोर्सची स्थापना : अर्थमंत्री हरपाल सिंह चीमा

चंडीगड : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी तीन महिन्यात एक व्यापक योजना तयार करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याची घोषणा पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंह चीमा यांनी केली आहे. लुधियानामध्ये पंजाब कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी, भारतीय कृषी संशोधनक परिषद, कोईंबतूरमधील ऊस संशोधन संस्था, पंजाब शुगरफेड आणि इतर तज्ज्ञांना शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आणि प्रती एकर उत्पादन वाढीसाठी टास्क फोर्समध्ये सामिल करण्यात आले आहे.

चीमा यांनी सांगितले की, पुढील दोन वर्षात ऊसाचे उत्पादन किमान १०० क्विंटल प्रती एकर करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात प्रती एकर ३६,००० रुपयांची वाढ होईल. एका अधिकृत घोषणेनुसार या योजनेअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञान आणि यात्रिकीकरणाचे प्रशिक्षण देण्यासह शेतकऱ्यांना उच्च प्रजातीची बियाणे दिली जातील. चीमा यांनी सांगितले की सरकार सहकारी साखर कारखान्यांच्या कामगिरीत सुधारणेसाठी, त्यांना आत्मनिर्भर बनविण्याचे प्रयत्न करण्यासाठी आधुनिकीकरणाच्या योजनेचा प्रस्ताव तयार केला जाईल. यासाठी एका समितीची स्थापना केली जाईल, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here