हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
गोरखपुर: उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर मध्ये बांधकाम चालू असलेल्या पिपराइच या साखर कारखान्याचा दौऱ्यावरती असताना अशी घोषणा केली कि या कारखान्याचे उदघाटन 24 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील.
साखर कारखान्याची तपासणी केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की हा देशातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित साखर कारखाना आहे. तसेच ते म्हणाले की 24 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान औपचारिकपणे याचे उद्घाटन करतील , त्याच दिवशी चाचणी ही सुरू होईल आणि ऊसाचे गाळप मार्चपासून सुरू होईल.
तसेच त्यांनी सांगितले की या साखर कारखान्याच्या उदघाटनानंतर 500 लोकांना थेट नोकऱ्या मिळतील व 5000 लोकांना रोजगार मिळेल . या कारखान्याच्या कार्यान्वयनाच्या वेळी, या क्षेत्रातील थेट 40 हजार शेतकऱ्यांना लाभ होईल आणि आसपासच्या क्षेत्रातील ऊस उत्पादकांनाही याचा फायदा होईल.
मुख्यमंत्री म्हणाले की या साखर कारखान्यात दर दिवशी 50,000 क्विंटल ऊसाचे गाळप करण्याची क्षमता असेल आणि नंतर दररोज 75 क्विंटल ऊसाचे गाळप करण्यात क्षमता वाढविली जाईल. या साखर कारखान्या मुळे प्रदूषण होणार नाही, जे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे. येथे शेतकऱ्यांनी केलेल्या साखर कारखान्याच्या मागणीची पुर्तता सरकारं ने केली आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp
Kisan ke Lia free information broadcasting konsi sait deti hi.