फ्रान्सची साखर, इथेनॉल उत्पादक कंपनी Tereosने केली Ludwig de Mot यांची सीईओपदी नियुक्ती

पॅरिस : फ्रान्सची साखर आणि इथेनॉल निर्माता टिरोयोसने लुडविग डी मोट (Ludwig de Mot) यांची आपल्या नव्या सीईओपदी नियुक्ती केली आहे. ते आता फिलिप डी रेनल यांच्या जागी कार्यभार सांभाळतील. फिलिप डी रेनल यांनी फेब्रुवारी महिन्यात एक वर्षानंतर कंपनीला सोडचिठ्ठी दिली. जगातील दुसरी सर्वात मोठी साखर उत्पादक असलेल्या Tereosकडून आपल्या वरिष्ठ व्यवस्थापनात फेरबदल करण्यात येत आहे. २०२० मधील आपल्या भूमिकेचा आढावा घेण्यात येत आहे. तर दीर्घ काळापासून सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळे अध्यक्ष आणि सीईओंना समुहाबाहेर काढण्यात आले आहे.

५८ वर्षीय बेल्जियमचे डी. मोट हे यापूर्वी स्वीसपोर्ट या विमानसेवा समुहामध्ये प्रभारी अंतरिम व्यवस्थापक होते. त्यापूर्वी त्यांनी देखभाल सेवा, खनिज उत्पादन, पॅकेजिंग उद्योगामध्ये बोर्डाचे सदस्य, कार्यकारी पदांवरही काम केले आहे. समुहाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, पहिल्यांदाच टेरेसोसने फ्रान्स बाहेरील व्यक्तीला सीईओपदी नियुक्त केले आहे. डी. मोट यांची कारकिर्द ७ एप्रिलपासून सुरू होईल. Tereosने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, लुडविग डी मोट यांचा औद्योगिक क्षेत्रातील अनुभव आणि तज्ज्ञ ज्ञान Tereosला अधिक सक्षम बनवेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here