हवामानाच्या माहितीने मिळणार ऊस तथा साखर उत्पादनाचा अंदाज

सहारनपूर : ऊस विभाग आता शेतकऱ्यांना हवामानाच्या अंदाजानुसार शेती करण्यासाठी माहिती पुरवणार आहे. कारण, साखर कारखाने हवामानाच्या नोंदींच्या आधारावर ऊस तसेच साखर उत्पादनाचे पूर्वानुमान वर्तवू शकतील. यासाठी ऊस विकास विभागाकडून ऊस विकास परिषदेकडील हवामानाचे रेकॉर्ड सुरक्षित ठेवले जाणार आहे. ऊस उत्पादनासाठी हवामान बदल तसेच वातावरणाचा प्रत्यक्ष प्रभाव पडल्याने विभागाला ऊस तसेच साखर उत्पादनात अडचणी निर्माण होत होत्या.

याबाबत जागणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस उत्पादन, उताऱ्यावर हवामान बदलाचा प्रत्यक्ष प्रभाव पडतो. हवामान विभागाचा कोणताडी डेटाबेस सध्या विभागाकडे नाही. मात्र, हवामान बदलाचा परिणाम उत्पादनातील उतार-चढावात प्रतिबिंबीत होतो. या समस्या सोडविण्यासाठी ऊस विकास परिषदांच्या स्तरावर हवामानाच्या दैनंदिन नोंदी ठेवल्या गेल्या, तर त्या आधारावर ऊस उत्पादनाशी संबंधीत कार्यक्रमात आवश्यकतेनुसार बदल करणे शक्य आहे. याबाबत जिल्हा ऊस अधिकारी कृष्ण मोहन मणी त्रिपाठी यांनी सांगतिले की, राज्याच्या ऊस आयुक्तांनी, संजय भुसरेड्डी यांनी सर्व ऊस आयुक्त तथा जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना ऊस विकास परिषदांमध्ये हवामानाचे रेकॉर्ड ठेवण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्येक ऊस विकास परिषदेत योग्य ठिकाणी या नोंदी घेतल्या जातील. दैनंदिन तापमान, पर्जन्यमान, ह्युमिडिटी रेकॉर्डिंग आदींच्या नोंदी उपयुक्त ठरतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here