पाचव्या दिवशीही दिलासा : पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही

नवी द‍िल्‍ली : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ केल्यानंतर आता सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळताना दिसू लागला आहे. गेल्या पाच दिवसांपासून इंधन दरात वाढ झालेली दिसून येत नाही. यापूर्वी ६ एप्रिल रोजी पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रती लिटर ८० पैसे वाढ करण्यात आली होती. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार ११ एप्रिल रोजी राजधानी दिल्लीत पेट्रोल १०५.४१ रुपये प्रती लिटर तर डिझेल ९६.६७ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. २२ मार्चनंतर इंधन दरात वाढ सुरू झाली आहे. गेल्या तीन आठवड्यात दहा टक्के दरवाढ करण्यात आली आहे.

याबाबत झीन्यूज डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, मुंबईत पेट्रोल १२०.५१ रुपये आणि डिझेल १०४.७७ रुपये तर चेन्नईत ११०.८५ रुपये पेट्रोल आणि डिझेल १००.९४ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. कोलकातामध्ये पेट्रोल प्रती लिटर ११५.१२ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९६.८३ रुपये प्रती लिटर दराने विक्री केले जात आहे. १० मार्च रोजी पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर पुढील दीड आठवड्यात इंधन दरात किरकोळ बदल दिसला होता. २२ मार्चनंतर दरवाढीस सुरुवात झाली. ६ एप्रिलपर्यंत विविध टप्प्यात १० टक्के दरवाढ झाली आहे. आता ७ एप्रिलपासून आजअखेर पाच दिवस दर स्थिर आहेत. पेट्रोल-डिझेलचा दर तुम्ही SMS च्या माध्यमातूनही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP लिहून शहराच्या कोड नंबरसह ९२२४९९२२४९ या क्रमांकावर मेसेज पाठवून दराची माहिती घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here