काहिरा : इजिप्तच्या सरकारी खरेदी एजन्सी जनरल अथॉरिटी ऑफ सप्लाय अँड कमोडिटीजने (जीएएससी) भारताकडून गहू तसेच साखरेसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीत स्वारस्य दर्शविल्याचे वृत्त प्रसार माध्यमांनी दिले आहे. भारतीय दुतावासाने याबाबत इजिप्तच्या गहू खरेदी करण्यात स्वारस्य दर्शविणाऱ्या कंपनीस कोणत्याही स्थानिक एजंट अथवा प्रतिनिधीच्या माध्यमातून नोंदणी करण्याचा आग्रह केला आहे. GASC सोबत पुरवठा करारासाठी भारतीय कंपन्यांना प्रासंगीक औपचारिकता पूर्ण कराव्या लागतील.
कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे (APEDA) अध्यक्ष एम. अंगमुथू यांनी सांगितले की, जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढी जीएसएससीसोबत नोंदणीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सक्रिय गहू निर्यातदारांसोबत विवरण देण्यात आले आहे. अंगमुथू यांनी सांगतिले की इजिप्तचे एक व्यापारी शिष्टमंडळ १० एप्रिलपासून देशातील फाइटोसॅनिटरी शासन, गहू उत्पादन प्रणाली, ग्रेडिंग, नियंत्रण याबाबत माहिती घेण्यासाठी भारतात राहील. १५ एप्रिलपर्यंत देशात हे शिष्टमंडळ थांबेल आणि मध्य प्रदेश, पंजाब आणि गुजरातचा दौरा करेल. काहिरा यांनी सांगितले की इजिप्तमध्ये राष्ट्रीय खाद्य सुरक्षा प्राधिकरणाच्या निकषानुसार आयात करण्याची गरज आहे.