फिलिपाईन्समध्ये कमी उत्पादनामुळे साखर आयात करण्याचा सल्ला

मनिला : देशात झालेल्या कमी उत्पादनामुळे ३,५०,००० मेट्रिक टन (एमटी) साखर आयात करणे गरजेचे असल्याचे Sugar Regulatory Administration (SRA)ने म्हटले आहे. SRAचे प्रशासक हर्मेनेगिल्डो आर. सेराफिका यांनी म्हटले आहे की, साखर आयातीस विरोध करणारे लोक खाद्य सुरक्षेच्या मुद्यावर विचार करण्यात असफल राहीले आहेत. ते म्हणाले, कोरोनामुळे बंद अर्थव्यवस्था खुली झाल्याने साखरेच्या मागणीत वाढ झाली आहे. आगामी महिन्यांमध्ये, खास करुन जून ते ऑगस्ट या कालावधीतील आपला देशांतर्गत खप पूर्ण करण्यासाठी साखरेचे स्थानिक स्तरावर उत्पादन होणे शक्य नसल्याचे एसआरएच्या लक्षात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

एसआरएने अलिकडेच साखरेची चौथ्या क्रमांकाची ऑर्डर पुढे केली आहे. यामध्ये २,५०,००० मेट्रिक टन रिफाईंड साखर आयात करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी १,५०,००० मेट्रिक टन प्रीमियम ग्रेड अथवा बॉटलर्स ग्रेड रिफाईंड साखर आहे. उर्वरीत १,००,००० मेट्रिक टनामध्ये कच्च्या साखरेचा समावेश असेल. सेराफिका यांनी सांगितले की, नैसर्गिक आपत्ती आणि ऊस लागवड विस्कळीत झाल्यामुळे देशांतर्गत उत्पादन कमकुवत झाले आहे. त्यामुळे साखरेच्या किमती वाढल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here