नवी दिल्ली : आज, बुधवारीही पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सलग आठव्या दिवशी इंधन दर स्थिर राहिले आहेत. ६ एप्रिलनंतर हे दर स्थिर आहेत. आज दिल्लीत पेट्रोलचा दर १०५.४१ रुपये, मुंबईत १२०.५१ रुपये, कोलकातामध्ये ११५.१२ रुपये आणि चेन्नईत ११०.८५ रुपये प्रती लिटर आहे. डिझेलचा दर पाहिला तर दिल्लीत ९६.६७ रुपये, मुंबईत १०४.७७ रुपये, कोलकातामध्ये ९९.८३ रुपये आणि चेन्नईत १००.९४ रुपये प्रती लिटर आहेत. नोएडामध्ये पेट्रोलचा दर १०५.४१ तर डिझेल ९६.६७ रुपये प्रती लिटर आहे. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरावर दबाव निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत दर १०५ डॉलर प्रती बॅरलजवळ आहे. कच्च्या तेलाच्या दर कपातीचा फायदा भारताला मिळत आहे. येथे ८५ टक्के तेल आयात केले जाते.
याबाबत टीव्ही९हिंदी डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, सरकार पेट्रोल, डिझेलच्या दराबाबत लवकरच मोठी घोषणा करू शकते असे प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. बिझनेस टुडेने सुत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, सरकार इंधनावरील एक्साइज ड्यूटीत कपातीबाबत विचार करीत आहे. २२ मार्चपासून आतापर्यंत तेल १० रुपयांनी महागले आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाईटवरील माहितीनुसार दिल्लीत पेट्रोलची बेस प्राइज ५३.३४ रुपये प्रती लिटर आहे. तर भाडे ०.२० रुपये प्रती लिर आहे. डिलरला पेट्रोल ५३.५४ रुपये प्रती लिटर दराने मिळते. त्यावर एक्साइज ड्यूटी २७.९० रुपये, डिलर कमिशन ३.८३ रुपये प्रती लिटर आणि व्हॅट १६.५४ रुपये प्रती लिटर आहे. विविध राज्यांत व्हॅट आकारणी विभिन्न आहे. पेट्रोल-डिझेलचा दर तुम्ही SMS च्या माध्यमातूनही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP लिहून शहराच्या कोड नंबरसह ९२२४९९२२४९ या क्रमांकावर मेसेज पाठवून दराची माहिती घेऊ शकतात.