महाराष्ट्र हवामान अपडेट : उकाड्यापासून दिलासा, या दिवसापासून उष्णतेची लाट शक्य

महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र, पावसाची शक्यता दिसून आलेली नाही. दुसरीकडे तापमानात घसरण नोंदण्यात आली आहे. राज्यात कमाल तापमान ४० डिग्रीच्या आसपास आहे. भारतीय हवामान विभागाने १८ एप्रिलपासून नागपूरसह अनेक जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.

सद्यस्थितीत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत ढगाळ स्थिती राहील अशी शक्यता आहे. त्यानंतर वातावरण स्वच्छ राहील. १८ एप्रिलपासून नाशिकसह अनेक ठिकाणी ढग दिसू शकतील. याशिवाय महाराष्ट्रात हवेची गुणवत्ता बहुतांश शहरात मध्यम अथवा समाधानकारक श्रेणीत नोंदवण्यात आली आहे. गुरुवारी मुंबईत कमाल ३६ तर किमान २४ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. दुपारनंतर ढगाळ हवामान राहील. वायू गुणवत्ता सूचकांक मध्यम श्रेणीत नोंदला आहे. पुण्यात कमाल तापमान ३९ तर किमान तापमान २४ डिग्री सेल्सिअस राहील. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत असेल. नागपूरमध्ये तापमान ४२ आणि २७ असे राहिल. तर येथेही ढगाळ वातावरण राहू शकेल. नाशिक, औरंगाबाद येथेही अशीच स्थिती राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here